शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

फुटबॉलचा नवा अध्याय




आजचा दिवस हा भारतीय फुटबॉलच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे. आज १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला भारतात सुरुवात होईल आणि भारतीय फुटबॉलच्या नव्या अध्यायास प्रारंभ होईल. पहिल्यांदाच फिफाची स्पर्धा भारतात होत आहे आणि स्पर्धबद्दल सरकार, क्रिडाप्रेमी आणि विशेषत युवकांमध्ये उत्सुकता आहे. या स्पर्धेची वातावरणनिर्मिती ही सरकारने शाळा, कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवून केली. या स्पर्धेचे महत्व सरकारने ओळखले याबद्दल सरकारचे कौतुक केले पाहिजे.


   भारतामध्ये फुटबॉल चाहते मोठ्या संख्येने आहेत त्यांना विश्र्वचषक म्हणजे एक पर्वणीच असेल. फुटबॉल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळ आहे. या खेळात भारत नेहमी पिछाडीवर राहिला आहे. या खेळात भारताला  पायाभरणी करण्याची नामी संधी म्हणजे हा युवा विश्र्वचषक.  या स्पर्धेमुळे युवकांना प्रेरणा मिळेलच पण महत्वाच म्हणजे या स्पर्धेतून भविष्यातील मेस्सी, नेयमार जन्माला येतात आणि यामुळे भारताचे भविष्यातील मोठे खेळाडू यास्पर्धेमुळे तयार झाल्यास नवल वाटायला नको. युवा विश्र्वचषक स्पर्धा ही फुटबॉलच्या विकासाची नांदी समजून भविष्यात फुटबॉल तळागाळातील मुलांपर्यंत पोहचला तर या स्पर्धेचे मोठे यश मानता येईल.
   पुढील २२ दिवस प्रत्येक संघ विश्र्वचषक जिकंण्याच्या इर्षेने मैदानावर उतरेल. या थराराचे साक्षीदार होऊया आणि भारतीय युवा संघाला विश्र्वचषक स्पर्धेकरिता शुभेच्छा देऊया. काय माहित आपला भारतीय युवा संघ विलक्षण कामगिरी करुन देशाचा अभिमान वाढवेल. कारण खेळात काहीच अशक्य नाही.

चक दे इंडिया