शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

सचिन, तू जग जिंकलस ...



कॅप्शन जोडा
ज्या खेळाडूने तब्बल २४ वर्षे भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या मास्टर ब्लास्टर सचिन रमेश  तेंडूलकरने क्रिकेटला आज अलविदा केले. आज असा एकही क्रिकेटरसिक नसेल त्याच्या डोळ्यात पाणी आले नाही. सचिन क्रिकेटमध्ये नसणार आणि 'सचिन' 'सचिन' हा जयघोष स्टेडीयमवर घुमणार नाही  हि कल्पनाही करता येत नाही. श्वास आणि शरीराचे जसे नाते असते तसे तुझे  आणि क्रिकेटचे नाते आहे. सचिन खरच तू 'क्रिकेटचा देव' आहेस  याशिवाय काही शब्द नाहीत.या देवाला माझा  साष्टांग नमस्कार . ज्या खेळाडूने भारताचे नाव जगभरात रोशन केले अशा सचिनला सरकारने भारतरत्न जाहीर करून त्याच्या कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे.  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

जीवा लावी गोडी अशी नारबाची वाडी


होय महाराजा… 


                            नारबाची वाडी हा चित्रपट आज पाहिला. दिलीप प्रभावळकरांचा  सहज सुंदर अभिनय आणि गुरु ठाकूर यांच्या संवादाने चित्रपट मनाला भावतो. सर्व इतर कलाकारांनीही अभिनय उत्तम केला आहे. कोकणचे सौंदर्य आणि मालवणी कोकणी भाषेमुळे चित्रपटाला गोडवा प्राप्त झाला आहे. कथेची मांडणी अतिशय साधी सरळ आहे.हा चित्रपट पाहिल्यावर कुठे तरी अस वाटत सारखे सारखे सस्पेंस आणि वेगळ करण्याच्या नादात आपण साधेपणा विसरतो. साधेपणातहि मजा असते. ती रंजकता या चित्रपटातून दिसते. 'शबय शबय' आणि 'गझाल खरी काय' हि  चित्रपटातील  गाणीहि गुणगुणावीशी वाटतात. माणसाची प्रवृत्ती आहे  की जरी त्याच्याकडे सर्व असेल तरी त्याला  समाधान नसते सतत त्याला कुठल्या न कुठल्या गोष्टीचा हव्यास असतो आणि  याच लोभी वृत्तीवर चित्रपटातून भाष्य केल आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांत येतो.          



शुक्रवार, १९ जुलै, २०१३

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ...



     आज  आषाढी एकादशी सारा  महाराष्ट्र भक्तिरसात  दंग झाला आहे. वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भेटीने तृप्त झालेत. पुरोगामी महाराष्ट्रातील  वारीची परंपरा हि  ७०० वर्षे जुनी आहे. वारीमध्ये येणारी प्रत्येक व्यक्तीहि वारकरी असते येथे जात-पात,गरीब-श्रीमंत,स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात नाही.वारीमधील वारकऱ्यांची शिस्तबद्धता थक्क करणारी आहे.   वारकरी संप्रदायातून मानवतेचा प्रचार आणि प्रसार केला जातो. विठ्ठल नामाचा जप करत  वारी  एकादशीला पंढरपुरात येतात. आजच पंढरपुरातील वातावरण विलोभनीय अस असत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करून वारकरी आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आणि या सोहळ्याचे क्षण डोळ्यात ठेऊन परतीच्या प्रवासाला लागतात. या वारीचे  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीत महत्वाचे स्थान आहे.

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेछा
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

नवी दिशा नवी आशा


कॅप्शन जोडा
           
           
       
                      ज्या हॉकी खेळाने  भारताला ऑलिम्पिकमध्ये तब्बल ८ वेळा सुवर्णपदक मिळवून दिले. त्या हॉकीची आज दयनीय अवस्था आहे. २०१२ मध्ये  लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला  तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तसेच हॉकी संघटनामधील असणारे वाद .त्यामुळे हॉकीच्या भवितव्याचा विचार आतापर्यंत केला जात नव्हता.परंतु आयपील च्या धर्तीवर हॉकी इंडिया लीग सुरु करून हॉकीमध्ये व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न हा स्वागतार्ह्य आहे. त्यामुळे कमी मानधन मिळणाऱ्या हॉकी खेळाडूंना यामुळे चांगले मानधन मिळाले. हॉकी इंडिया लीग हि आंतरराष्ट्रीय  दर्जाची स्पर्धा असल्याने  मध्ये अनेक  परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे  भारतीय युवा खेळाडूंना चांगला  अनुभव मिळेल. हॉकी इंडिया लीगमुळे क्रिकेटवेड्या भारतामध्ये पुन्हा हॉकीला नवसंजीवनी मिळेल अशी आशा  करूयात  .