शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

विजयीभव:



       आजपासून दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे आशियाई क्रिडा स्पर्धेस सुरुवात होत आहे. आशिया खंडातील ४५ देश या स्पर्धेत सामील होणार आहेत. ऑलंम्पिकनंतर महत्वाची स्पर्धा म्हणून आशियाई स्पर्धेकडे पाहिले जाते. १९५१ साली दिल्ली येथे पहिली आशियाई स्पर्धा पार पडली. इन्चॉन येथे होणारी ही १७ वी आशियाई स्पर्धा आहे. भारतातर्फे या स्पर्धेत ६८९ जणांचा चमू पाठविण्यात आला आहे. ३६ विविध खेळांमध्ये भारत सहभागी होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक असणार आहे हॉकी संघाचा कप्तान सरदार सिंग. ही हॉकीसाठी अभिमानाची बाब आहे.
       या स्पर्धेत प्रामुख्याने नेमबाजी, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती कबड्डी आणि हॉकी या खेळामध्ये भारताला पदकांची आशा आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जितू राय, अभिनव बिंद्रा,राही सरनोबत यांनी सुवर्णवेध घेतला होता त्यांच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. आशियाई स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताने नेहमीच पदकांची लयलुट केली आहे. २०१० ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत भारतीय अॅथलिटसनी ५ सुवर्णासहित अनेक पदके मिळवली होती यावेळी या पदकांमध्ये वाढ होइल व्हावी. तिरंदाजीत दिपिका कुमारी आणि इतर खेळाडू सुवर्णवेध करण्यास आतूर आहे. बॅडमिंटनमध्ये सायना,सिंधु आणि पी. कश्यपकडून पदकाची अपेक्षा आहे. स्टार बॉक्सर विजेंदर सिग याच्या अनुपस्थित बॉक्सिंगपटूही ग्लोडन पंच देण्यास उत्सुक आहे. सुशील कुमार याने या स्पर्धेत माघार घेतली असली तरी योगेश्वर दत्तसह इतर कुश्तीपटू चीतपट करुन  सुशील कुमारची कमी जाणवू देणार नाही. स्कॉशमध्ये जोश्ना,दिपिका पल्लीकली याचां राष्ट्रकुलमधील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे. 
        प्रो कबड्डीमुळे कबड्डीला नवसंजीवनी मिळाली त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण जिंकू असा कबड्डीपटूंचा विश्वास आहे. कबड्डीमध्ये विशेष म्हणजे भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णच कामगिरी केली आहे. हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकविणारच आणि २०१६ च्या रियो ऑलंम्पिकचे टिकीट निश्चित करणार असा चंग हॉकी खेळाडूंनी बांधला आहे. महिला हॉकीकडूनही पदकाची अपेक्षा आहे.  स्टार टेनिसपटूंच्या गैरहजरीतही सानियाकडून पदकाची आस आहे. रोईंग, गोल्फ, बिलियर्ड या खेळांतूही भारतास पदक मिळू शकतात.
        स्पर्धेचा इतिहास पाहता चीन,जपान आणि दक्षिण कोरियाचे पदक तालिकेवर वर्चस्व असते. भारत पहिल्या दहामध्ये स्थान असते यावेळी मात्र एकंदर या स्पर्धेत पदकांची लयलूट करुन भारताने २०१४चे एशियाड गाजवावे  आणि पदकतालिकेत पहिल्या पाचात येऊन क्रिडा क्षेत्रात नवा अध्याय लिहावा हीच सामांन्य क्रिडा रसिकांची आशा आहे. तर चला या पुढील १५ दिवस या स्पर्धेचा आनंद लुटुया आणि खेळाडूंना प्रोत्साहित करुया...