सोमवार, १ डिसेंबर, २०१४

इंटरनेट एक व्यसन

आजच्या काळात सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत.मानवाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती केली. इंटरनेटमुळे तर माहितीचा  विस्फोट होऊन जगाचे  द्वारच खुले झाले आहे. कोणत्याही व्यक्तीस कुठल्याही स्वरुपाची माहिती  इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली.इंटरनेटमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. भारतात आर्थिक उदारीकरणानंतर इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले. या इंटरनेटच्या फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा वापर केला असता समतोल साधणे फार महत्वाचे आहे. त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच त्याप्रमाणे इंटरनेटचा जास्त वापर केल्यास त्याचे व्यसन लागू शकते.


       आजची तरुणाई हि फेसबुक वोट्सअपवर बिझी असते. या साईटचा वापर करताना  आसपासच्या जगाचे भानही त्यांना राहत नाही.इंटरनेटवर सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या साईटमध्ये पोर्नोग्राफिक साईटसचा समावेश होतो. या  पोर्नोग्राफिक साईटसवरील व्हिडियो पाहून अनेकवेळा तरुण वाईट मार्गी जातात. तरुणांमध्ये विकृती वाढण्याच्या कारणांत इंटरनेटचा समावेश होतो. 
घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे 'इंटरनेट एडिक्शनअर्थात 'इंटरनेट'चे व्यसन लागण्याचे शहरातील मुलांचे प्रमाणही वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 'इंटरनेट'चा वाढता वापर चिंतेत भर घालणारी बाब असूनकम्प्युटर अथवा तत्सम इंटरनेट पाहण्याच्या साधनांच्या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिडअतिताण आदी विकार जडत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरुण मुले करतात कि आई वडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत.

  इंटरनेट व्यसनात गुरफटलेली ही मुले  खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहातात. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी/सत्याशी नातं तुटल्याने वा कमी झाल्याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात.कुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या आजघडीच्या गंभीर समस्येलागढुळलेले कौटुंबिकसामाजिक स्तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. इंटरनेट व्यसनाधीनता हे यातील एक महत्त्वाचं कारण!              


इंटरनेटचं व्यसन सोडवण्यासाठी मुक्तांगण


         जेव्हा कोणत्याही गोष्टीला भुलून त्याचा अतिरेक वापर केला जातोतेव्हा खरी त्या गोष्टीच्या व्यसनाची सुरवात होते. पण आजच्या जगात दारूतंबाखूचरसगांजा हेच फक्त व्यसन  राहील नाहीये. तर इंटरनेट ही व्यसनासारख वापरलं जावू लागलंय. अशाच इंटरनेट व्यसनी विद्यार्थीआणि मोठ्या व्यक्तींसाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रात इंटरनेट एडिक्शन सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.आजच प्रगत तंत्रज्ञान ज्या प्रमाणे आजच्या पिढीसाठी जगाच्या स्पर्धेत तारक आहे.तस्च ते त्यांच्यासाठी मारक बनत चालंल आहे. आजकाल टीव्हीकम्प्युटर यांचा वाढता वापर. त्यात तासंन तास इंटरनेटसोशल नेट वर्किंग साईट्सगेम्सपोर्न मुव्हीजचॅटीगमुळे ते सतत त्यातच गढून राहातायेत..त्यांच्या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.        

दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते या गोष्टींसाठी घालवतात आणि दारूतंबाखूचरस गांजा यांसारख या इंटरनेटचं व्यसन जडवून घेतायेत. सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्हणजेच या महाजालात ते स्वत:ला अडकून घेतायेत. आजच्या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्यक्तींना व्यसन मुक्ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केद्रात ही या वर्षभरात इंटरनेट एडीक्शनच्या ब-याच केसेस दाखल झाल्यात. यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं- मुलींच प्रमाण जास्त आहे.याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडील. ते घरात नसल्याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाहीआणि मग परिणामी ते या व्यसनाच्या आहारी जातातअशा विद्यार्थ्यांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे मुक्तांगण मध्ये आता या व्यसनावरही उपचार आता देण्यात येत आहेत.
त्यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे कीआपल्या मुलाला. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्याला याच सगळ्याचं व्यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्त व्यक्ती म्हणून त्याला समाजात उभ करायचं.