शुक्रवार, १९ जुलै, २०१३

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ...



     आज  आषाढी एकादशी सारा  महाराष्ट्र भक्तिरसात  दंग झाला आहे. वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भेटीने तृप्त झालेत. पुरोगामी महाराष्ट्रातील  वारीची परंपरा हि  ७०० वर्षे जुनी आहे. वारीमध्ये येणारी प्रत्येक व्यक्तीहि वारकरी असते येथे जात-पात,गरीब-श्रीमंत,स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जात नाही.वारीमधील वारकऱ्यांची शिस्तबद्धता थक्क करणारी आहे.   वारकरी संप्रदायातून मानवतेचा प्रचार आणि प्रसार केला जातो. विठ्ठल नामाचा जप करत  वारी  एकादशीला पंढरपुरात येतात. आजच पंढरपुरातील वातावरण विलोभनीय अस असत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करून वारकरी आपल्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आणि या सोहळ्याचे क्षण डोळ्यात ठेऊन परतीच्या प्रवासाला लागतात. या वारीचे  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीत महत्वाचे स्थान आहे.

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेछा
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल